Top News

नेफडो संस्थेतील शिक्षकांचा वृक्ष व भेटवस्तू देऊन सत्कार. #Teachersday

भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांचे- विजय जांभुळकर


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने संस्थेतील पदाधिकारी व सभासद जे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले व सध्या सेवेत आहेत त्यांचा सत्कार शिक्षक दिनाचे अवचित्य साधून वृक्ष व भेट वस्तू देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार जांभूळकर, नेफडो, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांची उपस्थिती होती.#Adharnewsnetwork


 तर प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका तथा नेफडो राजुरा तालुका महिला अध्यक्षा अल्का सदावर्ते, किरण हेडाऊ, सुनीता उगदे, प्रतिभा भावे, तर सध्या सेवेत असलेल्या शिक्षिका वीणा देशकर, वर्षा कोयचाडे, नागपूर विभाग सचिव तथा शिक्षक बादल बेले, नागेश उरकुडे, मोहनदास मेश्राम, सूर्यभान गेडाम, नेफडो राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व सत्कारमूर्तींना वृक्ष व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जांभूळकर यांनी आपले विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करताना शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात असे प्रतिपादन जांभूळकर यांनी अध्यक्षस्थानावरून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक उपलंचिवार शहर संघटिका यांनी केले. प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते यांनी तर आभार तालुका संघटक मनोज तेलीवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी अल्का सदावर्ते यांनी गुरुवंदना गायन करून उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नेफडो चे शहराध्यक्ष संदीप आदे, प्रदीप भावे, सुवर्णा बेले आदिसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सभासदानी अथक परिश्रम घेतले. #Teachersday

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने