🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

लोखंडी सळाखीने पतीने केला पत्नीचा खून. #Murder #death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरची (गडचिरोली):- कोरची मुख्यालयापासून अंदाजे ३५ किमी अंतरावर पोलिस मदत केंद्र कोटगुल अंतर्गत येत असलेल्या देऊळभट्टी येथे रविवारी (ता. ५) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पतीने पत्नीची लोखंडी सळाखीने खून केल्याची घटना घडली आहे. त्रिपुरारी बंजारे (वय ३५) असे आरोपीचे नाव असून त्याच्या मृत पत्नीचे नाव मंगेश्वरी त्रिपुरारी बंजारे (वय ३०) आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी त्रिपुरारी बंजारे हा छत्तीसगड राज्यातील येथील राजनांदगाव जिल्ह्यातील करमतरा येथील रहिवासी आहे. ही व्यक्ति मानसिकदृष्टया कमजोर असल्यामुळे मुलीच्या वडिलाने आपल्या मुलीला व आपल्या जावयाला आपल्या गावी हवाबदल होईल या कारणाने स्वगावी देऊळभट्टी येथे बोलवले होते.
रविवारी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पत्नी मंगेश्वरी बंजारे जेवण करीत असताना आरोपी त्रिपुरारी याने सळाखीने मारले. जबर वार असल्यामुळे मंगेश्वरी कोसळून खाली पडली. तिला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथे दाखल करण्यात आले. परंतु मंगेश्वरी गंभीर स्थितीत असल्यामुळे तिला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले.
परंतु गंभीर दुखापस झाल्याने तिचे प्राण वाचू शकले नाही. डॉ. विटनकर यांनी तिला मृत घोषित केले. तिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे करण्यात आले असून मंगेश्वरीला ५ वर्षाचा मुलगा व ३ वर्षाची मुलगी आहे. पुढील तपास पोलिस मदत केंद्र कोटगुल येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाल करीत असून प्राथमिक तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.