Top News

मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावला. #Chandrapur #death #mobile


धक्कादायक घटना.....
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मोबाईल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या मोबाईल वापराचे अनेक तोटे आणि दुष्परिणामही दिसून येत आहेत. 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मोबाईल बोलण्याच्या नादात एका शिक्षकाने आपला जीव गमावल्याची घटना मूल शहरातील पंचशील नगर भागात घडली आहे. #Chandrapur #death #mobile
चिरकुटा खोब्रागडे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. खोब्रागडे हे रात्री कानात हेडफोन लावून मोबाईलवर चालत असताना रेल्वेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त होतेय.
चिरकुटा खोब्रागडे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारी असलेल्या रेल्वे रुळावर फिरायला गेले होते. कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. गोंदियाकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत खोब्रागडे हे दूर फेकले गेले. त्यावेळी त्यांचा जागीत मृत्यू झालाय. खोब्रागडे हे मूल तालुक्यात उथळपेठ इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. शिक्षक दिनीच एका शिक्षकाचा मृत्यू झाल्यानं मूल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने