जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभुर्णा प्रभाग क्रमांक १ मधील विविध प्रकारच्या समस्या घेऊन वंचित बहुजन आघाडीची थेट नगरपंचायत वर धडक. #Pombhurna


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
पोंभुर्णा:- गेल्या दोन महिन्यांपासून प्रभाग क्रमांक १ मधील नळ योजना बंद असल्याने महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे बोरवेल संख्या नगण्य असल्याने एकाच विहिरीवर पाण्याची तहान भागवली जात आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक १ ची नळयोजना त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पोंभुर्णा येथील वार्ड क्रमांक १ मध्ये मागील अनेक दिवसांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्येला घेऊन वार्डातील नागरीकांनी आज नगरपंचायत पोंभुर्णा वर धडक दिली व निवेदन देण्यात आले.
यासोबतच साईनाथ मोगरकर यांच्या घराजवळ नळ कनेक्शन जोडण्यात यावे,प्रभाग क्रमांक १ मधील पथदिवे पुर्वरत चालू करण्यात यावे, बुद्धविहार जवळ बोरवेल (हातपंप) बसविण्यात यावे,बाबुळ तलाव (मोठा तलाव) कडे जाणर्या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत उभारण्यात यावी, वार्डातील रस्त्यांची साफसफाई करून धुरफवारणी करण्यात यावी, संविधान चौक येथील नवनिर्माण झालेल्या गेटला जुने नाव असलेले संविधान चौक याच नावाने रंगरंगोटी करण्यात यावी इत्यादी मागण्या घेऊन निवेदन देण्यात आले.येत्या चार दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर नगरपंचायत वर घागर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा देखील देण्यात आला.
सदर निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते बालाजी मेश्राम, रुपेश मानकर, चंद्रशेखर रामटेक,दिपिका दहिवले,वच्छलाबाई मानकर,गिता मानकर,आशा बांबोडे,वनिताताई रायपुरे, संध्याताई मानकर,मंगलदास लाकडे अविनाश वाळके, अतुल वाकडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत