आगीत महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात आधी ग्रामपंचायत कार्यालय होत. 2021 ला अस्तित्वात आलेली नगरपरिषद म्हणजेच घुग्घुस नगरपरिषद. घुघुस वासीयांच्या अनेक आंदोलनानंतर घुग्घुस ग्रामपंचायतीचे अखेर नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले. #Fire #Chandrapur
काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेला महिला मुख्याधिकारी म्हणून आर्शिया शेख यांची नियुक्ती सुद्धा झाली. नगरपरिषदेचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 8 सप्टेंबर ला पहाटे घुग्घुस नगरपरिषदेच्या इमारतीला भीषण आग लागली, सदर आगीत अनेक महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली.
इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, पण आगीच्या रौद्र रूपावर नियंत्रण मिळविण्यास वेळ गेला व महत्त्वाचे कागदपत्रे जळुन खाक झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून आगीत अजून किती नुकसान झाले हे पोलीस तपासात पुढे येईलच. सदर आग कशी लागली हे मात्र गुलदस्त्यात आहे.
घटनेची माहिती मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एसीसी कंपनीच्या अग्निशमन दलास बोलावले. घुग्घुस नगर परिषदेच्या गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या आग लागलेल्या गोदामाच्या खोलीतील सामान आपल्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढले. गोदामास आग लागल्याने घटनास्थळी बाजारातील दुकानदार व नागरिकांनी गर्दी केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत