जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पंचायत समितीच्या आवारात उत्पादक गटाच्या झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन संपन्न. #Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प व सुकन्या महिला प्रभाग संघाच्या वतीने व उत्पादक गटा अंतर्गत आज दिनांक 22 सप्टेंबर 2021 ला जिवती येथील पंचायत समितीच्या आवारात झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले..

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. आस्कर सर विस्तार अधिकारी पंचायत समिती जिवती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ मनीषा लांडगे मॅडम, नंदा मुसने मॅडम, सारिका नंदेवर , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. सर गोवळेवळे सर उपस्थित होते.

श्री.मनोज मेश्राम तालुका अभियान व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन करतांना उद्योग गटाच्या माध्यमातून सर्व महिलांनी  प्रयत्नाची पराकाष्ठा करून  या भागातील मुख्य  पीक ज्वारी पासून वेगवेगळे  उत्पादन बनवून   सर्व महिला उधोजक बनून  शाश्वत  उपजीविकेचे संसाधन निर्माण करावे असे संबोधित केले तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत मनोज किंनाके तालुका व्यवस्थापक, पंकज गोटापल्लीवार BC  FL , अशांत चालखुरे MIS,  सुरेश खोब्रागडेCC आणि  सर्व clm, cam यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत