ग्रा. पं. चुनाळा (पं. राजुरा) ची आमसभा संपन्न. #Meeting

Bhairav Diwase
0
चुनाळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिलीप शत्रुघ्न मैसने.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शासनाने कोरोनाचे थोडेफार निर्बध हटवल्यामुळे व ग्रामसभा घेण्यास दिलेल्या निर्देशानुसार मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. सभेला 162 मतदार सभासदांची उपस्थिती होती. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता असल्यामुळे कधी नव्हे 162 नागरिकांची उपस्थिती होती. या सभेत अध्यक्षपदा करिता झालेल्या निवडणुकीत या गावचे ग्रा. पं. चे माजी सदस्य व शिवाजी महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी हणमंतराव श्रीनिवसराव नाडपेल्ली यांना फक्त 12 व्यक्तींनी हात वर करून मतदान केल्यामुळे व उर्वरित सर्व सदस्यांनी चुनाळा येथील प्रतिष्ठित व येथील गोरक्षण सेवा समिती तथा अनाथ छत्रावासाचे व्यवस्थापक श्री दिलीप शत्रुघ्न मैसने मामा यांच्या समर्थनार्थ हात वर करून मतदान केल्यामुळे श्री दिलीप मामा यांचा विक्रमी मताध्याक्यांनी विजय होऊन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळू वडस्कर होते. या ग्रामसभेला ग्रा. पं. च्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या निवडी बध्दल सरपंच तथा भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख बाळू वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, तंटामुक्त समितीचे मावळते अध्यक्ष मनोहर निमकर, ग्रा. पं. सदस्य तथा भाजप चे शाखा प्रमुख सर्वश्री रवींद्र गायकवाड, सचिन कांबळे, राजु कीनेकर, दिनकर कोडापे, राकेश कार्लेकर, अर्चना आत्राम, उषा करमनकर, जया निखाडे, संतोषी साळवे, संतोषी निमकर, वंदना पिदूरकर, कोमल काटम, प्रकाश आस्वले, भाजप चे बूथ प्रमुख तथा बजरंग दलाचे संदेश दुर्गे, बूथ प्रमुख सुनील कार्लेकर, बूथ प्रमुख मनीष डाहुले, पोलीस पाटील रमेश निमकर,माजी ग्रा. पं. चे माजी सदस्य रमेश मायकुलकर, केशव वांढरे, सह येथील नागरिकांनी अभिनंदन केले. सभेमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलीप मामा चे खुलेआम समर्थन करून तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी निवड केल्याबद्धल उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.#Meeting

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)