Top News

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी प्रा.आ. केंद्र मुधोली येथे बैठक संपन्न. #Meeting



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील प्रा.आ.केंद्र मुधोली अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश मेश्राम व पर्यावरण मित्रचे शंकर भरडे, सचिन केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर व कोविड मित्र यांची संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली.#Adharnewsnetwork
बैठकीत पर्यावरण मित्रचे शंकर भरडे यांनी चंद्रपुर जिल्हयात पर्यावरण मित्र विरुर स्टेशनचे असलेले कार्य व कोरोना विषयक संस्थेची भूमिका स्पष्ट करुन या कार्यात संस्थेचे गावस्तरावर असलेले कोविड मित्र व आशा वर्कर यांचे समन्वयातून संभाव्य कोरोना लाटेपासुन सुरक्षित राहता येईल असा विश्वास व्यक्त केला. मुधोलीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिनेश मेश्राम यांनी आशा वर्कर व कोविड मित्र यांनी गावस्तरावर दक्ष राहुन कोरोनाबाबतची परिस्थिती कशी हाताळायची, कोविड लसिकरण कसे वाढेल, कोणकोणती माहीती आपणाकडे ठेवायची, जनजागृती कशी करायची यासारख्या महत्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करुन कोविड प्रतिबंधक लसिकरण जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा मनोदय व्यक्त केला. या बैठकीत प्रा.आ.केंद्रा अंतर्गत येत असलेल्या गावातील सर्व आशा वर्कर आणि वडाळा(तु), सोनेगाव, घोसरी, खुटवंडा, कोंढेगाव, सितारामपेठ, जुनोना, देवाडा व सावरी येथील कोविड मित्र सहभागी झाले होते.#Meeting

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने