जादुटोण्याच्या संशयावरून एकास मारहाण. #Nagbhid #beating

Bhairav Diwase

नागभीड तालुक्यातील मोहाडी (मोकासा) येथील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- चंद्रपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून एकास मारहाण केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सदर घटना नागभीड तालुक्यातील मोहाडी (मोकासा) येथे सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रात्रीच गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. #Nagbhid #beating
 
नागभीड तालुक्यातील मोहाडी (मोकासा) येथील रहिवासी दिलीप सीताराम वाघ (४९) हे घरी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास व्हरांड्याचे दरवाजात बसलेले असताना आरोपी विकास विनायक गजभे (१९) याने दिलीप वाघ यांचे घरी येऊन ''तूने माझा मोठा भाऊ वैभव वर जादू केली आहे, तू घराबाहेर निघ '' असे म्हणून शिवीगाळ करून चप्पल ने उजवे गालावर मारुन, हातबुक्कीने मारपीट केली. याबाबतची तक्रार नागभीड पोलीस स्थानकात दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.