गोंडपिपरीत गर्भवती महिलांसाठी अनीमिया तपासणी व समुपदेशन कार्यक्रम. #Program

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपीपरी:- कुपोषण हा भारताला झालेला एक आजार आहे. या आजारातून मुक्त होण्याकरिता पोषण आहाराची गरज असते.गर्भवती स्त्रियांनी आपले होणारे मुल हे शारीरिक दृष्ट्या सबळ विकसित होण्याकरिता काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भातील माहिती करिता आता शासण प्रशासनामार्फत अनेक स्तरावरून जनजागृती होत असून महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद,चंद्रपूर मार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना गोंडपीपरी चे वतीने गर्भवती महिलांसाठी अनिमिया तपासणी उपचार व समुपदेशना ्चा कार्यक्रम दिनांक 09 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते 12 वाजता ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आयोजित करण्यात आलेला असून सदर उपक्रमा चा जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संदीप बांबोडे अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय व शरद पारखी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.#Program