Top News

राजुरा शहरात वाहतूकीची कोंडी; पोलीस विभागाचे दुर्लक्ष. #Police



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा शहरातील पार्किंग व्यवस्थेत वाहणे पार्किंग न करणाऱ्या व दुचाकीवरून तीन लोक प्रवास करणारे, गाडीला नंबर प्लेट नसणे, वेगाने गाडी चालवत स्टंट मारणे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष स्वप्नील बाजुजवार याच्या नेतृत्व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाहदुरे यानां निवेदन देण्यात आले.#Adharnewsnetwork
राजुरा शहरातील नाका नंबर 3, नागराज कॅफे, हॉटेल फूड जंक्शन, पंचायत समिती चौक व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्थेमध्ये उभे न करता ती वाहणे भर रस्त्यात उभी करीत असल्याने वाटसरुणा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच गाडी ला नंबर प्लेट नसणे, टीब्बलशीट गाडी चालवने, वेगाने गाडी चालवत स्टंट मारणे, वाहतूक परवाना नसणे अश्या अनेक समश्या वाहतुकी संदर्भात असून यांच्यावर नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. वाहतूक व्यवस्थेमुळे कुठलाही अपघात, अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन यांस जबाबदार असेल.
करिता आपण आपल्या स्तरावर कायदेशीररीत्या कारवाई करून तात्काळ या सर्वांवर प्रतिबंध घालावा अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री.संतोषभाऊ देरकर, शहर अध्यक्ष श्री.रखीब भाऊ शेख, युवक तालुका अध्यक्ष श्री.असिफ भाऊ सय्यद, कार्याध्यक्ष श्री.संदीपभाऊ पोगला, शहर उपाध्यक्ष श्री.अंकुश भाऊ भोंगळे, शहर उपाध्यक्ष श्री.सुजित भाऊ कावळे, आदी उपस्थित होते.#Police

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने