जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर शहरात सोमवारपासून फिरते कोरोना लसीकरण. #Vaccine

महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून उपक्रम.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- संभाव्य कोरोना लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. जे नागरिक केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा दिव्यांग, ६० वर्षावरील वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेले व्यक्ती यांच्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून येत्या सोमवारपासून "लसीकरण आपल्या दारी" उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिरत्या लसीकरणावर भर असणार आहे, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत दिली.#Adharnewsnetwork
मनपाच्या नियमित लसीकरण समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीत महानगपालिका क्षेत्रातील ७ आरोग्य केंद्रांमध्ये झालेले एकूण लसीकरण आणि प्रतिकारक्षमता वर्धन (तान्ही बाळे) यांचा पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर आढावा व माहिती घेतली. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरण आणखी वाढविण्याचे उपाय, नागरिकांच्या डोक्यातील समज -गैरसमज दूर करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. याप्रसंगी मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अतुल चटकी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी डेंग्यू प्रतिबंधक अभियानामध्ये उत्तम योगदान दिल्याबद्दल उपस्थित कर्मचाऱ्यांच्या कार्याचा अतिरिक्त आयुक्त व अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव देखील करण्यात आला. याप्रसंगी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, आयएमए, नीमा, आपीए, रोटरी आणि जेसीआय आदींच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.#Vaccine

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत