🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. #BJP

पक्ष प्रवेशाने भाजपाची ताकत वाढणार:- देवराव भोंगळे


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. 
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रवेश घेणाऱ्या निलेश भोंगळे, राहुल मेश्राम, राम नांदे, गफर शेख, शाहरुख पठाण, शाहरुख खान, रफिक शेख, अजय कामतवार यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले मी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करतो निश्चितच यांच्या पक्ष प्रवेशा मुळे पक्षाची ताकत वाढणार आहे. यांच्या नेतृत्वात पक्षाचा विस्तार होणार अशी आशा व्यक्त करतो व सर्वांना शुभेच्छा देतो.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, हेमंत उरकुडे, अमोल थेरे, अजय आमटे, मुस्लिम शेख,मानस सिंग,गणेश खुटेमाटे, अक्षय लठ्ठा उपस्थित होते.#BJP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत