महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी रविकांत वसंतराव होरे यांची अविरोध निवड. #selection

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
विहिरगाव:- गावाच्या विकासासाठी धडपडणारा, ध्येयाने वेढलेला एक तरुण आपल्या गावाच्या सामाजिक ,सांस्कृतिक कार्यात तत्पर असलेला श्री.रविकांत वसंतराव होरे यांची "महात्मा गांधी तंटामुक्त समिती" अध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली.

एक उमदा तरूण अध्यक्षपदी गावाला लाभल्याबद्दल समस्त होरे परिवार विहीरगावचे सरपंच श्री.रामभाऊ देवईकर ,उपसरपंच श्री. खेडकर ,इर्शाद शेख सचिन बोढे पोलीस पाटील ,मनोहर धुडसे व समस्त विहीरगाव ग्रामस्थांतर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.#Selection