सोशल मीडियावर तरुणीची बनावट प्रोफाईल तयार करीत केली बदनामी. #Socialmedia #FakeProfile

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- घुग्घुस येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत नगाळा (सिदूर) येथील उपसरपंचावर विनयभंग गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पडोली परिसरातील रहिवासी एका युवतीची सोशल मीडियावर फेक प्रोफाइल तयार करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न गट ग्रामपंचायत नगाळा (सिदूर) येथील उपसरपंच सज्जन सातपुते 27 वर्षीय यांनी केला. या प्रकाराची माहिती सदर युवतीला मिळताच तिने पडोली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी सज्जन सातपुतेवर विनयभंग, जीवे मारण्याची धमकी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. 
आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सदर कारवाई पडोलीचे ठाणेदार महेश कोंडावार यांनी केली.