Top News

शाळेत जाण्यासाठी निघालेला विद्यार्थी नाल्यात गेला वाहून. #Student #CarriedtoNala


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चिमूर:- तालुक्यातील पेठ भान्सुली येथील गणेश विलास नन्नावरे (वय १२) वर्ष हा ग्राम दर्शन विद्यालय, खडसंगी येथे सहाव्या वर्गात शिकतो. मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शाळेत सायकलने जायला निघाला होता.
अमरपुरी नाल्याच्या रपट्यावरून सायकलचा तोल जाऊन नाल्यात वाहून गेला. त्याचा शोध गावकऱ्यांच्या मदतीने घेतला जात आहे.
सोमवार रात्रीपासून चिमूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाले तुडुंब भरले आहे. ग्रामीण भागातील लहान पुलावरून पाणी वाहत आहे. खडसंगी जवळील अमरपुरी गावाजवळील नाल्यावर असलेल्या लहान पुलावरून पाणी वाहत होते. या नाल्यावरील पुलावरून पेठ भान्सुली येथील विद्यार्थी ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी येथील शाळेत जाण्यासाठी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास निघाले.
सहाव्या वर्गात असलेला गणेश नन्नावरे या १२ वर्षीय मुलाच्या सायकलचा तोल जाऊन नाल्यात पडला. त्याच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडा ओरड करून याची माहिती गावकऱ्यांना दिली. गणेश वाहून गेल्याची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. त्वरित घटनास्थळावर पोलिस निरीक्षक मनोज गभने, साहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलिस कर्मचारी मानकर, गुट्टे तथा उरकुडे सोबत पोहोचले.
वाहून गेलेल्या गणेशचा अजूनही शोध लागलेला नाही. गावातील पोहणाऱ्या व पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. चंद्रपूर वरून मदत पथकास पाचारण केले आहे. काही वेळात हे पथक पोहोचेल, अशी माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने