जाहिरात... Advertisement... विज्ञापन

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा इरई नदीत बुडून मृत्यू. #Death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा चंद्रपूर येथील इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना प्रवीण वनकर असे युवकाचे नाव आहे. सोमवारी रात्री घडली असून मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
शहरातील स्थानिक रामनगर येथील बोकारे प्लॉट येथील सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी विसर्जन करण्यासाठी मंडळ रात्री विसर्जन पोहचले. या मंडळातील सदस्य विसर्जनाच्या निमित्याने बाप्पाच्या मूर्तीसह नदीत उतरले.
मात्र त्यातील ३ सदस्यांचा तोल सुटला. ते प्रवाहात वाहू लागले. विसर्जन स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांना कसेबसे वाचविले. मात्र प्रवीण हा नदीत बुडाला. रात्रभर त्याचा शोध घेण्यात आला. पण त्याचा पत्ता लागला नाही. मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत