जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अस्थी विसर्जनानंतर बंधाऱ्यात पोहणे बेतले जीवावर. #Death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चिमूर:- तालुक्यातील गरडापार येथील महिलेच्या अस्थी विसर्जनानंतर गावा जवळील बंधाऱ्यात मोरेश्वर दामाजी नन्नावरे (वय ५०) हे पोहायला गेले. पाण्याचा प्रवाह गतिशील असल्याने बुडून वाहत गेले.
यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह दुपारी दोन वाजताच्या सुमारास बंधाऱ्यापासून दोन किलो मीटर अंतरावर आढळला.
मिळालेल्या माहितीनुसार, गरडापार येथील ताराबाई पुंडलिक दडमल (वय ६०) यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांचा अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी पार पडला. त्यानंतर मोरेश्वर दामाजी नन्नावरे (वय ५०) व दिलीप नन्नावरे गावातील बंधाऱ्यावर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोहायला गेले. पाण्याच्या प्रवाहाची गती जास्त असल्याने मोरेश्वर वाहत गेले. तर दिलीप बंधाऱ्याकडील वेलाचा आधार मिळाल्याने स्वतःला कसेबसे वाचविले.
घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर पोलिस हवालदार मेहरकुरे सहकाऱ्यांसह पोहोचले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मोरेश्वर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोरेश्वर यांचा मृतदेह बंधाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आढळून आला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत