जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भावाची भेट तिच्यासाठी ठरली शेवटची. #Death #accident


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- भावाला भेटून सावली येथे आपल्या गावी जात असलेल्या एका महिलेला बल्लारशाह बायपास रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लीलाबाई रामचंद्र घडसे, सावली असे मृत महिलेचे नाव आहे.
लीलाबाई बाबूपेठ परिसरातील रहिवासी असलेले भाऊ क्रांतीलाल रायपुरे यांना भेटण्यासाठी आली होती. भेट झाल्यानंतर ती सावली येथे जाण्यासाठी निघाली. दरम्यान, बल्लारशा बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली.
दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांनी महिलेला आर्थिक मदत तसेच अज्ञात वाहन चालकाचा शोध घेण्याची मागणी केली. पोलिसांनी २४ तासात आरोपींचा शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांसह आपचे कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत