Click Here...👇👇👇

मारहाण प्रकरणातील " त्या " युवकाचा व्हिडीओ आला पुढे. #Viralvideo

Bhairav Diwase
1 minute read
सातपुतेना शिवीगाळ करतांना दिसतोय तरूण.
गोंडपिपरी:- काम मागायला गेलो असता माजी सभापतीने मारहाण केली, असा आरोप पत्रकार परिषदेत करणाऱ्या विजय येवले याचा एक समाजमाध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो सातपुते यांच्या घरी जावून शिवीगाळ करतांना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे मारहाण प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

*💥"हे" काँग्रेसचे कारस्थान:- दिपक सातपुते* 

गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) येथील विजय येवले (वय ३५ ) यांनी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य दिपक सातपुते यांचे घर गाठून कामाची मागणी केली.
गावात अनेक कामे सुरू आहेत. मला देखील कामावर घ्या. मी देखील तुम्हचा कार्यकर्ता आहे. मात्र काम नाही, असे उत्तर सातपुते यांनी दिले.त्यानंतर देखील येवले यांनी कामासाठी तगादा लावला.यामुळे चिडलेल्या दिपक सातपुते यांनी मला बेदम मारहाण केली. असा आरोप येवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
या प्रकाराची तालुक्यात चर्चा सूरू असतांनाच येवले यांचा व्हिडिओ समाजमाध्यमात धडकला.या विडीओत येवले सातपुतेना खालचा भाषेत बोलत असल्याचे दिसत आहे.या व्हायरल विडीओमुळे मारहाण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.