रेती तस्कराविरुध्द महसूल विभागाची धडक कारवाई. #Action

Bhairav Diwase

दोन ट्रॅक्टर जप्त; रेती तस्कराचे धाबे दणाणले.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी येथून चालत असलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर पकडून तहसिल कार्यालयात जमा केल्याची घटना आज दि.१९ आक्टोबर ला घडली.
ही कारवाई झिटे तलाठी हरांबा साजा, सागुळे तलाठी सावली साजा व आर आय कावळे यांनी साखरी येथे पकडून कारवाई करण्यात आली.
नुकतेच पावसाळ्याचे दिवस संपताच नदीचे पाणी कमी झाले आणि रेती बाहेर निघाली. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी आपल्या गोरखधंदाला सुरुवात करत असताना दि १९ आक्टोंबर ला दोन टक्टर तहशिल कार्यालयासमोर लावण्यात आले.
सदर तस्करीबद्दल पटवारी झिटे, सागुळे व आर आय कावळे यांना माहिती लागली होती.त्यांनी पहाटेच्या सुमारास साखरी या गावाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर पकडून तहसिल कार्यालयात जमा केले आहे. तर पुढील कारवाई तहसील प्रशासन करणार असल्याचे म्हंटले जात आहे असुन रेती तस्करी यांचे धाबे धनानले आहेत तर झिटे यांची या परीसरात दुसरी मोठी कारवाई असल्याने मात्र परीसरात वाहवाकी होताना दिसुन येत आहे आज रोजी तलठ्यानी साखरी घाटावर जाऊन दोन ट्रक्टरवर कार्यवाहि केली असून पुढेहि असिच कार्यवाही केलि जाईल असे संबंधित तलाढ्याकड़ून सांगितले जात आहे.
    सदरच्या ट्रॅक्टर सावली येथील नितिन दुवावार आणि धर्मेंद्र बोरकर याच्या असल्याच्या कार्यवाहि अधिका ऱ्या कडून सांगितले जात असले तरी महसूल विभागाच्या कार्यवाहिने रेती तस्कराचे ढाबे दनानाले आहे हे मात्र विशेष....