Click Here...👇👇👇

आर्मीत दाखल झालेल्या समीरच्या स्वागताला गाव एकवटला. #Army

Bhairav Diwase
गोंडपिपरी:- गावातील पोर देशसेवेसाठी सज्ज झाला. सैन्य प्रशिक्षण घेऊन गावात परतलेल्या पोराचा स्वागताला हारतूरे घेऊन गाव एकवटला. फटाक्यांची आतिषबाजी झाली. डिजेचा तालावर गावकर्यांनी ठेका धरला. गावकर्यांचा स्वागताने फौजी भारावला. गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथे हा सोहळा बघायला मिळाला.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावात सोमवारला आनंदाचे उधान आले होते. गावातील समीर विनोद मुत्तेवार हा तरूण सैन्य प्रशिक्षण पुर्ण करून परतला होता. आपल्या गावातील मुलाचा हातून आता देशसेवा घडणार आहे.या विचाराने अख्या गाव भारावला. गावाने हारतुरे घालीत समीरचे स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी केली. डिजेचा तालावर अख्या गावानेच ठेका धरला होता. गावकर्यांचे प्रेम बघून समीर भारावला होता. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या सैन्य भरती मध्ये समीरची निवड झाली होती.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समीरचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्याला आवड होती. सैन्यात भरती होणारा गावातील पहिलाच मुलगा असल्याने गावाचा आनंदाला पारावर उरला नाही .सद्या समीर चेकपिपरीला आहे. तीन दिवसा नंतर तो जामनगर (गुजरात) येथे देश सेवेसाठी रुजू होणार आहे.