जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ग्लोबल रोल मॉडेल अवार्ड आणि लोकमत एक्सलंट विदर्भस्तरीय अवार्डने सुशीला पोरेड्डीवार सन्मानित. #Award


गोंडपिपरी:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आक्सापुर येथील शिक्षिका सुशीला पोरेड्डीवार मॅडम यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा एकेडमी ग्लोबल रोल मॉडेल अवार्ड आणि लोकमत एक्सलंट विदर्भस्तरीय अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षपदी उपस्थित पंचायत समिती सदस्य भूमी चंद्रशेखर पिपरे तसेच उद्घाटक म्हणून मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे स्वयंसेवक अनिकेत बाळू बुरांडे हे उद्घाटक म्हणून होते. आणि उपस्थित इत्यादी नागरिक आणि शिक्षक वृंद हे उपस्थित होते.
यावेळी खूप मोठ्या जल्लोषाने मॅडमचा अभिनंदन साजरा करण्यात आला. व मॅडमला श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत