Click Here...👇👇👇

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बल्‍लारपूर तालुक्‍यातील ४९ लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप. #Ballarpur

Bhairav Diwase

बल्लारपूर:- आपल्‍या जीवाभावाच्‍या माणसांना गमावल्‍यामुळे आपल्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आपण आपले आप्‍त गमावले ही हानी कधिही भरून न निघणारी आहे. मात्र यामधून आपल्‍याला खंबीरपणे उभे राहावे लागेल, यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव आपल्‍या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक २९ ऑक्‍टोंबर २०२१ रोजी बल्‍लारपूर येथे राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेशाचे वाटप करण्‍यात आले. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी नगराध्‍यक्ष लखनसिंह चंदेल, भाजपा नेते अजय दुबे, बल्‍लारपूर तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, बल्‍लारपूरच्‍या उपविभागीय अधिकारी दिप्‍ती सुर्यवंशी, तहसिलदार संजय राईंचवार, बालविकास अधिकारी वैशाली सहारे, पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील मृत व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबातील स्‍वकीयांना २० हजार रूपयाचे धनादेश देण्‍यात येतात. हे अर्थसहाय्य 20 हजार रू व्हावे यासाठी मी प्रयत्न केले होते . अर्थमंत्री असताना या घटकांच्या स्‍वयंरोजगारासाठी २०० कोटी रूपयांची तरतूद केली. पण पुढे सत्तांतर झाले. शासकीय अधिका-यांनी गोरगरीबांची काम तात्‍काळ करावी, कोणत्‍याही व्‍यक्‍तीच्‍या मनात आपण अनाथ आहोत ही भावना निर्माण होता कामा नये. मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गोर गरिबांसाठी साठी अनेक योजना कार्यान्‍वीत केल्‍या आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळावा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याप्रसंगी राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बल्‍लारपूर तालुक्‍यातील ४९ लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप करण्‍यात आले.