Click Here...👇👇👇

चार वर्षांच्या चिमुकलीचा नदीत बुडून मृत्यू. #Death

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आजीसोबत नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार वर्षांच्या नातीचा नदीत वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २९) दुपारी तीन वाजताच्या सुमारास विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वढा तीर्थक्षेत्र परिसरात घडली. कस्तुरी ओमदेव गुरनुले असे नातीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घुग्घुस येथून काही अंतरावर वढा तीर्थक्षेत्र आहे. या परिसराला विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते. या वर्धा नदीच्या घाटावर परिसरातील महिला कपडे धुण्यासाठी जात असतात.
आज दुपारच्या सुमारास वढा तीर्थक्षेत्र येथील कांताबाई या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या. त्यांच्यासोबत त्यांची चार वर्षांची नात कस्तुरी हीसुद्धा गेली होती. आजी कपडे धुवत असताना कस्तुरी नदी काठावरून आत शिरली. मात्र, काही वेळातच ती नदीच्या प्रवाहात वाहून गेली. कस्तुरी वाहून गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती घुग्घुस पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून कस्तुरीचा शोध घेणे सुरू केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर तिचा मृतदेह मिळाला नव्हता.