Top News

ग्रामपंचायत राहपली (खुर्द) येथे ग्रामसेवकाचा मनमानी कारभार.#jiwati

ग्रा. प. मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा त. मु. अध्यक्ष किशोर चांदुरे यांचा दावा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- 15 वित्त आयोग मधून आलेल्या निधीचा दुरउपयोग झाला पेसा अंतर्गत आलेल्या निधीचा दुरपयोग झाला सरकार कडून आलेल्या निधीचा दुरपयोग झाला गावात कोणत्याच योजनेची माहिती होऊ देत नाही.गावातील पाणीपुरवठा टाकी पडण्याच्या मार्गावर असून पण लक्ष नाही.मागील 2 वर्ष्यापासून नळ योजना बंद आहे.2011 पासून नळ योजना बंद आहे असं शासनाला माहिती देऊन फुकट नळ पट्टी वसूल करत आहे.
गावातील नागरिकांनी जाब विचारला असता माहिती देण्यास ग्रामसेवक नकार देत आहे. लोकांना कुठलीही माहिती देत नाही.या मध्ये भ्रष्टाचार झाला आहे. असं गाववाशियांच म्हणणे आहे. लोकांना कोणत्याही शाशकीय योजनेबद्दल माहिती देत नाही. यात जनकल्याण निधी, अपंग निधी समान्य फंड याबद्दल माहिती देत नाही. ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहतं नाही लोकांना घरकुल योजने बद्दल माहिती देत नाही. या संशययाच्या भोहऱ्यात ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असे गावातील नागरिकांना वाटत आहे.
या ग्रामपंचायत च्या कामकाजाची चौकशी करून ग्रामपंचायत चा सर्व हिशोब ग्रामसेवाकानी द्यावा अशी गाववाशियांनी व त मु.अध्यक्ष किशोर चांदुरे व सर्व गावकऱ्यांनी मागणी केली आहे.#jiwati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने