Top News

काटवल व मुधोली येथे श्री गुरुदेव शेतकरी बंधा-यांचे बांधकाम. #Bhadrawati


जिल्हा कृषी अधीक्षक डाॅ. बराटे यांची भेट.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- रब्बी हंगामातील शेतपिकाला हमखास पाणी मिळुन उत्पादन वाढण्याचे दृष्टिकोणातुन वनराई आर्गेनिक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. मांगली (रै.) यांच्या वतीने व कृषि विभाग आणि अंबुजा फाऊंडेशन यांच्या सहकार्यातुन तालुक्यातील काटवल(भ.) व मुधोली येथे शेतकऱ्यांच्या बांधालगत असलेल्या नाल्यावर पाणी साठवनुकीसाठी नुकतेच श्री गुरुदेव शेतकरी बंधा-यांचे बांधकाम करण्यात आले.
वनराई कंपनीच्या संचालक मंडळानी स्थानिक शेतकरी गटांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यावर सिमेंटच्या रिकाम्या पिशवीत रेती व माती भरून व्यवस्थितपणे शिवल्यानंतर नाल्यात बांध बांधण्यात आले. या दोंन्ही बंधा-याची जिल्हा कृषी अधीक्षक डाॅ. बराटे व प्रभारी तालुका कृषी अधिकारी कोमटी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच बंधा-यांचे महत्व व पाण्याचा शेतपिकासाठी वापर या विषयावर शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले.
यावेळी वनराई आर्गेनिक फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी चे अध्यक्ष अजय पिंपळकर, सचिव रवींद्र जिवतोडे, संचालक परशुराम जांभुळे, महादेव धारणे, सागर भोंगळे, अनिता भरडे, शेतीनिष्ठ शेतकरी केशव विरुटकर, सर्व कृषि सहाय्यक, अंबूजा फाऊंडेशनचे सर्व सदस्य व स्थानिक शेतकरी गटांचे सर्व सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कंपनी तर्फे कंपनीच्या सभासदांना मोहरी बियाणाचे वितरणही करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने