Top News

स्वयंसहाय्यता समुहांसोबत दिवाळी........ #Sindewahi


दिवाळी फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. सिंदेवाही अन्त्तर्गत कार्यरत आई महिला ग्रामसंघ रत्नापुर येथील स्वयंसहाय्यता समूहातील होतकरु महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व स्वयंसहाय्यता समूहांनी दिवाळी सनानिमित्य बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी सिंदेवाही येथील पंचायत समिती परिसरात भव्य स्टॉल उभा करून दिवाळीचे फराळ,साहित्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे थाटात उद्घाटन मा. सौ. मंदाताई बाळबुद्धे सभापती पं.स. सिंदेवाही यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. मा. घाटोडे सर स. गट विकास अधिकारी पं. स. सिंदेवाही श्री. मा. महाजनवार विस्तार अधिकारी पं.स. सिंदेवाही, श्री. मा. कांबडे सर कृषी अधिकारी पं.स. सिंदेवाही कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्री.विवेक नागरे सर तालुका अभियान व्यवस्थापक, श्री उद्धव मडावी सर तालुका व्यवस्थापक BM-IBCB, ,कु.सविता उईके प्रभाग समन्वयक, श्री. संदीप उईके सर प्रभाग समन्वयक, सचिन लोध्ये CAM व cam तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. सिंदेवाही च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व दिवाळीचे फराळ,विक्रि स्टॉलचे थाटात उद्घाटन झाले. यानिमित्याने जास्तीत जास्त लोकांनी दिवाळीचे फराळ व साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने