बल्लारपूरात महाराष्ट्र बंद दरम्यान दुकान बंद करण्यावरून वाद. #Chandrapur #Ballarpur

Bhairav Diwase

वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना तुरुंगात डांबले याच्या आरोप करीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंद दरम्यान बल्लारपूर शहरात दुकान बंद करण्यावरून वस्ती विभागातील गांधी चौक परिसरात एका इसमाची व आंदोलनकर्त्यांशी शाब्दिक वाद झाला. मात्र वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
एकूनच बल्लारपूर शहरात महाराष्ट्र बंद हा शांततेत पार पडला असून व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवून बंद ला समर्थन दिले, तर सकाळी १०:०० नंतर पेट्रोल पंप ही बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही.