पुन्हा सात मुलींची त्या मुख्याध्यापकाविरोधात तक्रार. #Chandrapur

Bhairav Diwase

7 ऑक्टोबर पर्यंत मुख्यध्यापकाला पोलिस कोठडी.

गुन्ह्याचा तपासाकरिता विशेष पथकाची निर्मिती.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबर पासून वाजली, मात्र बल्लारपूर येथे शाळेचा पहिला दिवस लाजीरवाण्या घटनेने हादरून गेला, बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक 57 वर्षीय भाऊराव तुमडे यांनी 5 व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढली.
ही लाजिरवाणी बाब पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितली असता केम तुकूम येथे तणाव वाढला, पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. बल्लारपूर पोलीस तात्काळ शाळेत दाखल होत मुख्याध्यापक तुमडे यांना अटक करीत ठाण्यात नेले. या प्रकारानंतर 1 नाही तब्बल 7 मुलींनी मुख्याध्यापक विरोधात तक्रार दाखल केली.
रात्रभर सुरू असलेल्या घटनाक्रमात पोलिसांनी मुख्याध्यापक तुमडे यांचेवर कलम 376 (AB), 376 (2) (F), कलम 4, 6, 8 व 12 पोक्सो Pocso अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. 5 ऑक्टोबर ला आरोपी मुख्याध्यापक तुमडे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर घटना बाल लैंगिक अत्याचार चा गुन्हा असल्याने गुन्ह्याचा तपासाकरिता विशेष पथक तयार करण्यात आले असून पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, मपोउपनी नेहा सोलंके, पोक्सो पथकातील व्ही. आर. गायकवाड, गुन्हे शोध पथक प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.