(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुर परीसरात बिडी पत्त्याचे बोनस 2019 पासून आता पर्यंत मजुरांना मिळाले नाही. विरुर स्टेशन परिसरातील खांबडा, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहिरगाव, चनाका, तुलाना या गावाचे नागरिक राजुरा येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. गावकऱ्यांनी प्रत्येक वर्षी वरीष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले व वन विभाग यांना माहिती सुद्धा दिली असता तरीपण अजून पर्यंत नागरिकांना बोनस मिळाले नाही.#Adharnewsnetwork
अधिकाऱ्यांनी गोर गरजू लाभार्थ्यांना न्याय देत नाही. राजुरा तालुक्यातील तेंदू पत्ता संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांना त्वरीत बोनस देण्यात यावा, तेंदुपत्ता संकलन करणाऱ्यांची रोजगारात अडवूणुक करु नये व अन्य काही मागण्याकरीता तेंदुपत्ता मजूर संघटना तालुका राजुरा यांच्या वतीने 4 ऑक्टोंबर ला वन विभाग कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राजुरा तालुक्यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांना 3 वर्षातील थकीत असलेले बोनस तात्काळ देण्यात यावा. अशी मागणी तेंदूपत्ता मजूरांनी केली आहे.#movement