राजुरा येथील सुपरमार्केट येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा; शिवभक्तांची मागणी. #Rajura

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, विरुर स्टे.
राजुरा:- राजुरा येथील सुपरमार्केट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता आणि शिवभक्त शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची शिव जयंतीदिनी अनेक नागरिक शिवाजी महाराजांची पूजा करून शिवजयंती साजरी करायचे. परंतु आता शिवभक्तांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 कारण दि 2 ऑक्टोबर रोजी राजुरा सुपर मार्केट मधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नगर परिषद द्वारे हटवून वेगळ्या ठिकाणमध्ये स्तलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूतळा सुपरमार्केट राजुरा येथे बसवण्यात यावा अशी मागणी सर्व शिवभक्तानी अरुणभाऊ धोटे यांचा कडे केली आहे. त्याप्रसंगी शुभम आत्राम, नितीन सिदाम, सूरज भामरे, महिपाल मडावी, आकाश राधारप, तुषार मोरे आणि समस्त शिवभक्त परिवार उपस्थित होते.#Rajura