Click Here...👇👇👇

निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या लेबर वस्तीला लागलेल्या आगीत कामगारांचे मोठे नुकसान. #Fire

Bhairav Diwase
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेने उपमहापौर राहुल पावडे यांनी केली कामगारांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. येथे काम करीत असलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था मेडिकल कॉलेजच्या परिसरात केली होती. या वस्तीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.शासकीय वैद्यकीय इमारतीचे काम आटोपल्यानंतर मजूर घरी गेले.#Adharnewsnetwork
स्वयंपाक करीत असताना अचानक आठ सिलिंडरचा एकामागे एक असा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे दाखल झाले. अग्निशामक दलाला बोलविणत आले. दोन तासानंतर आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. या आगीत कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहे.
सदर कामगार मोठ्या अडचणीत सापडला असून सर्व साधन सामुग्री जळाल्याने त्यांच्या राहण्याचा व भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेने चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यानी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या व तात्काळ कामगारांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करून दिली.#Fire