महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या आंबेडकर चौक येथे ऑटोरिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन संपन्न. #Chandrapur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौक बाबुपेठ बायपास रोड चंद्रपूर येथे ऑटोरिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन दिनांक ०९ ऑक्टोंबर २०२१ रोजी सांय. ०५. ०० वाजता ऑटोसंघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, भाजपा नेते रघुवीर अहिर नगरसेवक प्रदिप किरमे, गणेश गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, रवि आंबटकर, प्रकाश पात्र, राजु यादव, राजु मारशेट्टीवार, गणेश गेडाम, दौलत नगराळे, अमोल नगराळे, पराग मलोडे, किशोर मासिरकर, देविदास मेश्राम,सचिन वासनिक, आकाश गायकवाड,रामकुमार वाघमारे,गिरीश राजपुरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौक, बाबुपेठ बायपास रोड चंद्रपूर ऑटो रिक्षा स्टॅड वरील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व सहमती ने स्टॅड ची कार्यकारणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष पदी किशोर मसारकर निवड करण्यात आले आहे. तसेच सचिव पदी राजकूमार वाघधरे, उपाध्यक्ष पदी देविदास मेश्राम, कोषाध्यक्ष गिरीश राजापुरे हे चारही सर्वानुमते निवड करण्यात आले आहे.
यावेळी सुमित थुल, संदिपदास नगराळे, राजकुमार प्रधान, मिलिंद कोटांगले, चेतन लांडे, मुस्कान वासनिक, अनिल यादव, किशोर दुर्गे, प्रविण बुजाडे, दौलत खोब्रागडे, आकाश गायकवाड, अशोक थुल, गफार शेख, अनुराग फुलझेले , निलेश रामटेके , थेरे, असंख्य ऑटोचालक उपस्थित होते.