Click Here...👇👇👇

सोयाबीन कापायला गेलेल्या शेतमजुराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. #Death

Bhairav Diwase

मृतक सावली तालुक्यातील सोनापूर चा रहिवासी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- पोटाची खडगी भरण्यासाठी परजिल्ह्यत सोयाबीन कापन्यासठि गेलेल्या मजूराचा मृत्यु झाल्याची घटना नुक़तीच घडली. नाजुक चटाते 45 वर्ष असे मृत्यु पावलेल्या मजूराचे नाव असून तो सोनापुर येथील रहिवाशी होता. धान पिक निदना नंतर तालुक्यात रोजगाराचे साधन नाही, अनेक मजूर रिकामे असल्याने कुटुंबाचा प्रपंच भागविताना मोठी अड़चन निर्माण होत असते. त्यातही समोर येणारी दिवाळी या कालावधित परप्रांतत आणि पर जिल्ह्यात सोयाबीन पिक कापनिला सुरुवात होत असते, त्यामुळे तालुक्यातील अनेक मजूर सोयाबीन कापनिला जात असतात.

🤦‍♂️व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर झाला होता डाऊन!

सावली तालुक्यातील सोनापुर येथील काही मजूर सोयाबीन काढणी साठी यवतमाळ जिल्यात गेले होते.त्यात नाजुक चटारे या मजूराचा हृदय विकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 3 च्या पहाटे घडली आहे. सोनापुर येथील नाजूक चटारे वय 45 हा मृतक असून सोयाबीन कापण्याकरिता मु. कोहळा ता. नेर जिल्हा यवतमाळ येथे गेले होते. त्यांची अचानक रात्रौ तब्बेत बिघडली त्यांना सुरवातीला नेर येथील रुग्णालयात भरती केले.त्यानंतर यवतमाळ येथे न्यायला सांगितले व त्याला यवतमाळ रुग्णालयात भरती केले असता त्याचे निधन झाले.
मृतक युवक हा कष्टकरी होता.त्याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याच्या मागे आई,वडील, पत्नी,2 मुले असा बराच आप्त परिवार आहे.