🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोळसा खाणीकडे जाणारा ट्रक अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटवला. #Fire

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वणी:- वणीच्या रेल्वे सायडिंगवर कोळसा खाली करून मुंगोली खाणीत जात असलेल्या ट्रकला पाच ते सहा अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून पेटवून दिले.
रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पेटवून देण्यात आलेला ट्रक हा चंद्रपूर येथील पीएमपील ट्रान्सपोर्ट कंपनीचा आहे. ट्रकचालक चरणदास गोच्चूम शन्नूरवार (रा.घुग्गूस) हा रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ट्रकमधील कोळसा रेल्वेसायडिंगवर खाली करून मुंगोली कोळसा खाणीकडे निघाला होता. मुंगोली कोळसा खाणीच्या चेकपोस्ट क्रमांक १ वर अचानक पाच ते सहा इसमांनी ट्रक अडविला. या अज्ञातांनी धमकी देऊन ट्रकचालक चरणदासला ट्रकच्या खाली उतरविले. त्यानंतर ट्रकच्या केबीनवर पेट्रोल शिंपडून ट्रक पेटवून दिला.

🤦‍♂️व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर झाला होता डाऊन!

त्यामुळे ट्रकचा क्षणात भडका उडाला. धावाधाव आरडाओरड सुरू झाली. लगेच खाणीतील अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोवर ट्रकची केबीन जळून खाक झाली होती. अज्ञात इसमांनी केलेल्या कृत्यात ट्रकचे १२ लाख रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
व्यावसायिक वादातून ही घटना घडली असावी, अशी पोलिसांना शंका आहे. त्या दिशेने तपास केला जात आहे. जाळपोळ करणारे आरोपी पोलिसांच्या टप्प्यात असून लवकरच ते हाती लागतील, असा विश्वास या प्रकरणातील तपास अधिकारी पीएसआय कांडुरे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत