भटारी येथील मजुराचा सोयाबीन थ्रेशर मध्ये अडकल्याने मृत्यू. Death


यवतमाळ जिल्ह्यातील खडकी (गणेशपूर) येथील घटना.
यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे शेतातील सोयाबीन काढतांना थ्रेशर मध्ये अडकल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दिनांक ३० ऑक्टोबरला दुपारी ०३:०० वाजताच्या दरम्यान खडकी (गणेशपूर) येथे घडली. विलास भूदाजी तोडासे वय ५५ वर्षे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी खडकी (गणेशपूर) येथील ठावरी नामक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन काढण्याकरीता ट्रॅकटरसह थ्रेशर आणले होते. थ्रेशरवर सोयाबीन काढण्यासाठी म्हणून पोंभुर्णा तालुक्यातील भटारी या गावातील मजूर विलास भूदाजी तोडासे वय ५५ वर्षे हे हजर होते. सोयाबीन काढताना त्यांचा तोल जाऊन ते थ्रेशरच्या बेल्टवर पडले आणि तसेच ते थ्रेशर मध्ये ओढल्या गेले. या घटनेत त्यांचा जागीच मुत्यु झाला.
या धक्कादायक घटनेची माहिती आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना मिळताच बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिस पाटील यांनी सदर घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली, तोच उपनिरीक्षक राजू नवरे व पोलिस नाईक संतोष मडावी यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्युची नोंद दर्शविली. पंचनामा होताच मृतकाचे शरीर विच्छेदनासाठी झरी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या