ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन तात्काळ बस सेवा चालू करा; निवेदनाद्वारे मागणी. #Chandrapur #Pombhurna


चेक बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना निवेदन.
पोंभुर्णा:- ग्रामिण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दैनिक पोंभूर्णा ते चेक बल्लारपूर येणे जाणे करावे लागते. पोंभूर्णा ते चेक बल्लारपुर हे अंतर जवळपास १२ ते १५ कि. मी. अंतराचे असून सदर रस्ता जंगलव्याप्त असल्याने साईकल, पायदळ शाळेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामिण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अलीकडे वाघांचे हल्ले होत असल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने आर्थिक दृष्ट्या जाणे- येणे शक्य होत नाही. नियमित महामंडळाची बस सेवा नसल्याने पोंभूर्णा ते चेक बल्लारपूर या रोडला चिंतलधाबा, सोनापूर, चेक आष्टा या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या परीसरात तात्काळ बस सेवा चालु करणे अत्यंत जरूरीचे आहे.
ग्रामिण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये सर्व ग्रामिण विद्यार्थी विद्यार्थीनी सुरक्षित प्रवास होणाच्या दृष्टीकोणातुन मौजा चेक बल्लारपूर ते पोंभूर्णा शाळेच्या वेळेवर नियमित बससेवा चालु करण्याचे निवेदन शिवसेना उप तालुका प्रमुख रविंद्र ठेंगणे यांच्या नेतृत्वाखाली चेक बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा एस. टि कामगार संघटना विभागीय अध्यक्ष संदिप गिऱ्हे यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख रविंद्र ठेंगणे, शिवसैनिक नितीन येरोजवार, शिवसैनिक लोकाजी दावनपल्लीवार, तसेच विद्यार्थी  सौरभ भगत, प्रज्वल माहोरे, दिपक कुंचेवार, बादल मोगरे, विशाल बल्की, प्रतिक पवार, अनिल मेकर्तीवार, प्रणय माहोरे, योगेश मत्ते, नेहल पेंदोर, सागर शेडमाके, निलेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने