Top News

प्रा. आ. केंद्र नेरी येथील वैद्यकिय अधिकारी यांचे नियमबाह्य निलंबनाच्या विरोधात २० ऑक्टोबरपासून बेमुदत संप. #Doctor


मॅग्मो व आरोग्य विभागातील इतर संघटना मार्फत बेमुदत संपाची हाक.
चिमूर:- दिनांक १४ ऑक्टोबरला प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरी येथे सकाळी ७.३० वाजता अतिशय गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णाला उपस्थित वैद्यकिय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवा दिली. परंतु दुदैवाने सदर रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर वैद्यकिय अधिकारी उपस्थित नव्हते असा चुकीचा ठपका ठेवून, कोणतीही चौकशी न करता नियमबाह्य रित्या संबंधित वैद्यकिय अधिकारी यांची बाजू ऐकुन न घेता कुठलीही चौकशी न करता सदर वैद्यकिय अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
त्यामुळे कोवीड महामारीत गेल्या एक ते दिड वर्षापासून काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांमध्ये तिव्र असंतोषाची भावना निर्माण झाली असून त्याविरुध्द मॅग्मो (महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकिय अधिकारी गट-अ संघटना) तसेच महाराष्ट्र राज्य वैद्यकिय अधिकारी महासंघ शाखा चंद्रपूर व सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांच्या पाठिंब्याने दिनांक २० ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन दिनांक १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आलेले आहे.
संप काळात जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सेवा जसे बाह्य रुग्ण सेवा, कोवीड लसिकरण, कोवीड तपासणी इत्यादी सेवा बंद राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने