🌄 💻

💻

पोंभुर्णा राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे खासदार सुप्रिया सुळे यांना दिले निवेदन. #Pombhurna


पोंभूर्णा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल योजनेकरीता निधी प्राप्त झालेल्या नविन घरकुल मागणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांना तात्काळ कार्यारंभ आदेश काढावे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष भुजंग ढोले यांची मागणी.

पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरात केंद्र सरकार यांचे सर्व समावेशक धोरणानुसार सन २०१७-२२ पर्यंत मागेल त्याला घरकुल देण्याचे केंद्राचे स्पष्ट निर्देश आहेत. तसेच केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना करीता मागील दोन वर्षापासुन नगरपंचायत, पोंभूर्णा यांना घरकुल या शिर्षकाखाली निधी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु नगरपंचायत, पोंभूर्णा यांच्या तांत्रिक अडचणीमुळे २०१७ पासुन ते आजपर्यंत अनेक लाभार्थी खर्च करून दस्ताऐवज व फाईल नगर पंचायत कडे जमा केलेले आहे.


परंतु नगर प्रशासन नागरीकांच्या घरकुल या मुलभूत समस्येकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पर्यायाने घरकुल या शिर्षकाखाली जमा झालेला घरकुल निधी नगरपंचायत च्या उदासीन धोरनामुळे सदर निधी खर्चीत न करता परत जाण्याच्या मार्गावर आहे. पुढे चालुन आचारसंहिता लागु होण्याची दाट शक्यता आहे. पर्यायाने चार पाच वर्षापासुन घरकुलाच्या प्रतिक्षेत असलेले अनेक लाभार्थी घरकुल या मुलभुत अधिकारापासून वंचित आहेत. व नगर प्रशासन जाणिव पुर्वक लाभार्थ्यांच्या घरकुल या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत आपल्याला वेळोवेळी अवगत करण्यात आलेले आहे. करीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पोंभूर्णा नम्र विनंती आहे की, पोंभूर्णा शहरातील वंचित असलेल्या संपूर्ण लाभार्थ्यांना तात्ळीने घरकुल कार्यरंभ आदेश मिळण्याकरीता आपल्या स्थरावरून पाठपुरावा करून पोंभूर्णा शहरातील लाभार्थी नागरीकांना किचकट दस्ताऐवजापासुन सुट मिळण्यात यावी. व घरकुल कार्यरंभ आदेश देण्याच्या सुचना नगर प्रशासनाला करून अनेक वर्षापासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यात यावे. असे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना नुकतेच पोंभुर्णा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत