Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

"राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्या माध्यमातून "आजादी का अमृत महोत्सव " वर्षानिमित्य महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान. #Gondpipari


चंद्रपूर:- श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथील "राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्या माध्यमातून "आजादी का अमृत महोत्सव " वर्षानिमित्य महाविद्यालयातील परिसरात दि. 27/10/2021 ला स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आला.
या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा उपक्रम प्राचार्य डॉ. चक्रधर ए. निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार आणि प्रा. अविनाश वि. चकिनारपूवार व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघने आणि डॉ. रुद्रप्रताप तिवारी यांनी केले. या उपक्रमाला महाविद्यालयातील प्रा. संजय कुमार, डॉ. आशिष चव्हाण, प्रा. प्रतीक बेझलवार,. प्रा. जगदीश गभने, डॉ. संजय सिंग, डॉ. हरिओम सिंग तोमर, प्रा. शरद लखेकर, प्रा. पूनम चंदेल आणि ग्रंथपाल कु. नलिनी जोशी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत