🌄 💻

💻

चिंतामणी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज गोंडपिपरी येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन. #Gondpipari


गोंडपिपरी:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे दिनांक २५-१०-२०२१ रोज सोमवार ला महाविद्यालयातिल ग्रंथालय विभाग व स्पर्धा परीक्षा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थांसाठी "नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आभासी पद्धतीने करण्यात आले.

सदर कार्यशाळेत प्राध्यापक अविनाश चाकिनारपुवार, स्पर्धा परीक्षा विभाग यांनी माहितीपर मार्गदर्शन केले तर ग्रंथालय विभागाच्या प्रमुख कु. नलिनी जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबी समजाऊन सांगितल्या, सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका कू. पूनम चंदेल यांनी केले, कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत