Click Here...👇👇👇

उन्नत भारत अभियान योजने अंतर्गत चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स ॲंड सायन्स, गोंडपिपरी तर्फे पाच गावाची निवड. #Selection

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- देशभरातील सर्व उच्चशिक्षण संस्था स्थानिक समुदायांशी जोडल्या जाव्यात, व त्यांना विकासा साठी आवश्यक असणारी तंत्रज्ञानाने पुरविला यावीत या उद्देशाने 11 नोव्हेंबर 2014 ला उन्नत भारत अभियान ही योजना मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा सुरु करण्यात आली.

अभियानाची उदिष्टे......
  • ग्रामीण भारताची गरज विचारात घेऊन उच्च शिक्षण संस्थामध्ये संस्थात्मक क्षमता किंवा विस्तार करणे.
  • विज्ञान, अभियांत्रीकी, लाजिक व व्यवस्थापन शिक्षणात अग्रेसर संस्थाच्या माध्यमातून व्यावसायिक आदाने पुररावी.
या योजने अंतर्गत चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स ॲंड सायन्स, गोंडपिपरी या नामांकित कॉलेज तर्फे गोंडपिपरी तालुक्यातील धाबा, विठ्ठलवाडा, करंजी, अकलापूर व थानापूर असी पाच गावे दत्तक घेतली आहेत.

गाव दत्तक घेण्याची उदिष्टे.....
  • गावपातळीवर विविध समस्या जाणून घेणे.
  • महत्वाच्या समस्या जाणून घेऊन त्याचा आराखडा तयार करुन याची माहिती संकलित करून घेणे. भारत सरकारला कळविणे व निधी मंजूर करून घेणे.
  • गावातील लोकांना, भारत सरकारच्या विविध योजना कोणत्या प्रकारच्या मिळतात. याची माहिती संकलित करून घेणे.
उन्नत भारत अभियान या योजनेचे कॉलेजचे सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. सि. ए. निखाडे समन्वयक प्रा. शरद लखेकर, सदस्य प्रा. महेन्द्र अक्कलवार, सदस्य प्राध्यापिका पूनम चंदेल व इतर सर्व प्राध्यापक हि योजना यशस्वी रित्या राबवत आहे.