Top News

स्वच्छता राखा, रोगराई टाळा; ग्रामस्थ यांची जनजागृती. #Sindewahi

ग्राम स्वच्छतेवर बैठक.
सिंदेवाही:- वासेरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे विचाराने प्रेरित होऊन , स्वच्छ गाव , सुंदर गाव. हा हेतू मनाशी बाळगून गावातील काही नागरिकांनी स्वच्छ भारत अभियान आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालय वासेरा येथे बैठक आयोजित करून समिती गठित करण्यात आली . यामध्ये गावातील उघड्यावर जाणाऱ्या व्यक्तींना शौचालयात जाण्यास सक्ती करणे, गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीवर जळाऊ लाकडे, बांधकाम साहित्य, ठेवल्याने नाली बुजून पुढील जाणारे पाणी थांबले असल्याने नालीवरील साहित्य काढून टाकणे, गावातील रस्त्यावर बांधणारे जनावरे, रस्त्यावर ठेवलेले ट्रॅक्टर, चारचाकी वाहने, इत्यादी जड वस्तू काढून टाकणे, इत्यादी विविध विषयावर सकारात्मक चर्चा करून स्वच्छता मोहीम राबविण्याचे सर्वांनी ठरविले. यावेळी समितीचे अध्यक्ष तारकांत बोरकर, ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर, उपसरपंच मंदा मुनघाटे, ग्राम पंचायत सदस्य महेंद्र सूर्यवंशी, नागेश बंडीवार, सुरेखा चिंमलवार, गीता मेश्राम, ग्राम सेवक नरेंद्र वाघमारे, माजी सदस्य राजु नंदनवार, तंटामुक्त समितीचे सदस्य हेमंत सूर्यवंशी, दिनकर बोरकर, जीवन बावणे, भगवान धात्रक, वासुदेव बोरकर, संजय कापकर, आकाश कोवले, राजु मस्के, मुकरुजी मडकाम, वासुदेव पुस्तोडे, सुधाकर मेश्राम, सचिन पुस्तोडे, पांडुरंग कामडी, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावातील गणपत पुस्तोडे यांचे ग्राम स्वच्छता दुत म्हणून निवड करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने