Top News

राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर! #Vacation


🟥 राज्यातील शाळांना उद्यापासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे.
🟥 मुंबईतील शाळांना दिवाळीची 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण निरीक्षकांनी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती.
🟥 त्यामुळे शाळा कधीपर्यंत सुरु राहणार आणि सुट्टी कधी लागणार याची उत्सुकता होती. आज सरकारने राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.
🟥28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. अर्थात शाळांना दिवाळीच्या 12 दिवस सुट्ट्या असणार आहेत.
🟥 राज्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या नव्हत्या, त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यातील अन्य विभागात शाळांना दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या.
🟥 मुंबईत मात्र, शाळांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नव्हती त्यामुळे पालकांना दिवाळीच्या सुट्टीतले नियोजन करता येत नव्हते.
🟥 दरम्यान, कोरोनामुळे मागील दीड वर्षात अनेक पालक आपल्या गावी जाऊ शकले नाहीत. आता कोरोना संसर्ग थोडा कमी झाल्याने अनेक पालक आपल्या मूळ गावी वा अन्य ठिकाणी जाण्यासाठी तयारी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने