🌄 💻

💻

बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या तलावात इसमाची आत्महत्या. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मूल:- मूल येथील बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या तलावात आत्महत्या केल्याची घटना आज 4 वाजता उघडकीस आली.

आत्महत्या करणाऱ्या चे नाव मोहन मार्कंडी तेलावार वय 75 असे आहे. मोहन तेल्लावर हें काल दिनांक 26 च्या सायंकाळ पासून घरून निघून गेले होते. ते घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी मूल पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. लगेच मूल पोलिसांनी शोध सुरु केला असता बसस्थानकाला लागूनच असलेल्या तलावाच्या काठावर मोहन तेलावार यांची चप्पल दिसली. तलावात शोध घेतला असता त्यांचा प्रेत आढळून आला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नव्हते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत