Top News

ग्रामसभेमध्ये उर्मटपणे बोलणाऱ्या व वागणाऱ्या व ग्रामसभेचा अपमान करणाऱ्या तलाठी यांचेवर कारवाई करा; निवेदनाद्वारे मागणी. #Gondpipari


गोंडपिपरी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार.

७ दिवसात निलंबनाची कार्यवाही न झाल्यास ८ व्या दिवसापासून तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा.
गोंडपिपरी:- वढोली येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. विभागातील माहिती आणि आवश्यक चर्चा करण्यात आली. आणि ज्या मध्ये कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी कार्यकर्ती तसेच ग्रामपंचायत विभागापैकी आपआपल्या समस्ये बाबत ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली.

महसूल विभागा अंतर्गत चर्चा करण्यात आली असता, जे. टी. बल्की (तलाठी) यांच्या विभागाबदल चर्चा करण्यात आली असता, त्यांनी आपल्या विभागातील माहिती देण्यास ग्रामसभेस सुरूवात केली त्या वेळेस ग्रामसभेत उपस्थित लोकांनी त्यांना आपल्या विभागाकडे १ ते दिड वर्षा पासून आमचे काम पडून असून विसदा तलाठी ऑफिला चकरा मारून सुध्दा काम होत नाही. तर पैसे कश्यावे घेता असे म्हणताच तलाठी यांनी रागाच्या भरात जनतेला उर्मटपणाने बोलताच जनता त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागली.

एक वर्षापासून १७ चकरा तलाठी कार्यालयात मारायला लावता व कारण सांगता तसेच पुरबूडी किंवा अतिवृष्टीचे फार्म वर सही मारण्यासाठी रूपये घेतात असे विचारताच तलाठी यांनी चुकीच्या शब्दात लोकांना बोलू लागले आणि सरपंच तथा ग्रामसभेचे अध्यक्षांनी त्यांना या प्रश्नावर जॉब विचारला असता तलाठ्यांनी ग्रामसभेचा अपमान केला. शासकिय कामात अडथळा आणला त्याचे हातवारे करून बोलतानाचे व्हिडिओ चित्रफित सुद्धा करण्यात आले. तसेच वढोली गावातील व परिसरातील नागरीक तलाठी कार्यालयात कामानिमित्ताने गेले असता कोणतेही काम असो सरळ सरळ पैशाची मागणी करतात असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. जर नागरीकांनी पैसे देण्यास नकार दिला तर त्यांना सदर कार्यालयात उर्मट वागणूक देण्यात येवून त्यांचे काम न करता त्यांना हाकलून देण्यात येते.

    शेतकऱ्यांना छोट्या छोट्या कामासाठी सतरा चकरा माराव्या लागतात करिता संबंधीत तलाठी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावातील सर्वोच्च सभा असलेल्या ग्रामसभेला अश्या पद्धतीने उर्मटपणे उत्तर देणाऱ्या व अश्लिल हावभाव करून समस्त ग्रामसभेचा अमपान व अनादर करणाऱ्या तलाठी जे. टी. बल्की यांची विभागीय चौकशी करण्यात यावी व त्याचेवर कायद्यानुसार ग्रामसभेचा अनादर व अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमा अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार गोंडपिपरी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
    निवेदनाची तात्काळ दखल घेऊन त्यांचेवर ७ दिवसाचे आत निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व वढोली साजा १० तुन त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी. ७ दिवसात निलंबनाची कार्यवाही न झाल्यास ८ व्या दिवसापासून तहसिल कार्यालय, गोडपिपरीच्या समोर सर्व ग्रा. पं. पदाधिकारी व सदस्य तथा ग्रामस्थासोबत बेमुदत उपोषण करण्यात येईल. व याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा ग्रामपंचायत चे सरपंच राजेश वासुदेवराव कवठे यांनी दिला.
गोंडपिपरी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना तकरारीचे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रा. प. सरपंच राजेश कवठे, ग्रा. प. सदस्य मुरलीधर आत्राम, सुरेंद्र मदपालिवार, अनिल खरबनकार, सुधीर पोत्रजवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप लाटकर, रुचीगंगा प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल सोनटक्के, तंटामुक्त समिती अध्यक्ष शामराव सोनटक्के उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने