जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न. #Pombhurna

पोंभूर्णा:- तालुका काँग्रेस कमेटी पोंभूर्णा तसेच शहर काँग्रेस कमेटी तर्फे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
तालुक्यात युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी, पक्ष वाढीसाठी, आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची कार्यप्रणाली व संघटन कौशल्याचा वापर करून निवडणुकीत काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी शक्तीनिशी प्रयत्न करणे ,गावा गावात वार्डनिहाय बुथ कमेटी स्थापन करणे, युवक काँग्रेसची कार्यप्रणाली गतीमान करणे, महिला कमेटी स्थापन करणे, काॅंग्रेसचे विचार व धोरण घराघरात पोहोचविणे, युवकांचे,महिलांचे, शेतकऱ्यांचे,मजुरांचे व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे यासह अनेक बाबी वर चर्चा करण्यात आली.
बैठकीला नगरपंचायतचे काॅंग्रेसचे माजी गटनेते अतिक कुरेशी, उपाध्यक्ष रुषि पोल्लेलवार,शहर अध्यक्ष दत्तू येल्लूरवार, माजी सभापती बापुजी चिंचोलकर, संजय गांधी निराधार योजना समीतीचे अध्यक्ष साईनाथ शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
यावेळी युवक काँग्रेसचे गजानन सेमले सरपंच नवेगांवमोरे, चकफुटाणा उपसरपंच ईश्वर पिंपळकर, देवाडा बुद्रुक चे उपसरपंच हेमंत आरेकर,घोसरी उपसरपंच प्रशांत झाडे , गणेश अर्जुनकर, किशोर अर्जूनकार, अंशुल मोरे, हेमंत आरेकर,राजाराम मोहुर्ले, परशुराम कावरे, हर्षानंद दुर्गे, स्वप्नील ढवस आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत