(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- बल्लापुर तालुक्यातील तुकूम येथील जि.प. शाळेतील मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास अधिकार्यांना मार्गदर्शन केले.
प्राप्त माहिती नुसार दिडवर्षानंतर शाळा सुरू होण्याचा पहिल्या दिवशी बल्लापुर तालुक्यातील तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनिवर अत्याचार केला. या घटनेची माहिती पालकांना होताच पालकांनी शाळेवर धडक दिली. व मुख्याध्यापकाला अटक करण्याची मागणी केली. तसेच ईतर सहा मुलींना सोबत सुध्दा अश्लील चाळे केले. या बाबत बल्लापुर पोलिस स्टेशन ला तक्रार दिली असता आरोपी मुख्याध्यापका विरूध्द भा.दं.वि. कलम 376, (अ)(ब) (2) (फ) सह कलम 4, 6, 8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर माहिती मिळताच तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनात पोक्सो पथकामधिल महिला अधिकारी पुढिल तपास करित आहे.