Click Here...👇👇👇

माजरी चंद्रपुर बस सेवा पूर्ववत सुरू करा. हॅन्सन राव यांची मागणी. #Chandrapur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोविड काळात मागील दोन वर्षापासून बंद असलेली वणी- माजरी- वरोरा- चंद्रपुर एस. टि. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजरी ग्रामपंचायत चे सदस्य हॅन्सन प्रकाश राव यांनी महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा कडे केली आहे.
कोविड काळात सदर बस सेवा बंद केल्यामुळे माजरी व परिसरातील नागरिकांना ये जा करण्यात मानसिक ञास सहन करावा लागत आहे. सध्या परिस्थितीत अनलाॅक ची प्रक्रिया प्रुर्नत्वास आली आहे. हॅन्सन राव यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेवून सदर बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ.सुधिर मुनगंटिवार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चंद्रपुर विभाग नियंञक यांचा कडे एका पञाद्वारे केली आहे.